HW News Marathi
महाराष्ट्र

‘युतीच्या बातम्या तुम्ही रंगवता, मी जो काही आहे तो आहे’, युतीसंदर्भात राज ठाकरेंचं उत्तर!

पुणे। गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिक याप्रसंगी भेट झाली होती आणि तेव्हापासूनच भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे मनसे-भाजप युती होणार असल्याच्या चर्चांना अधिक बळकटी मिळाली. या संपूर्ण प्रकरणावर आज पुण्यात राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

माझ्या भूमिका स्पष्ट आहे

राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर राज ठाकरेंनी म्हटलं, “भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. मी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत. त्यासोबतच देशहिताच्या सुद्धा भूमिका मांडल्या आहेत. प्रत्येक राज्याने आपआपली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि काय काय केले पाहिजे. तुम्ही आमच्यावर आक्रमक केले नाही पाहिजे आणि आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाहीयेत”.

ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा विरोध केला

“भूमिकांना विरोध आहे, व्यक्तींना विरोध नाही. माझा नरेंद्र मोदींना विरोध नाही आणि अमित शहांनाही नाहीये, वैयक्तिक देणघेणं नाहीये. ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा विरोध केला आणि ज्या भूमिका पटल्या त्यांबाबत अभिनंदनही केलं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तुम्ही प्रश्न निर्माण करायचे आणि आम्हाला उत्तरं द्यायला सांगायचे. युतीच्या बातम्या तुम्ही रंगवता, मी जो काही आहे तो आहे, माझी भूमिका बदलत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

Aprna

संजय राऊतांच्या कारवाईनंतर सरकारला कोणताही धोका नाही, गृहमंत्र्यांचा विश्वास

Aprna

सांगलीतील मृत्युदर राज्यात सर्वाधिक, जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा !

News Desk