बीड | पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले असून शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळं येथील नागरिकांना एक ना संकटाचा सामना करावा लागत आहेत. यामुळं पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज (२९ जुलै) परळीत मदतफेरी काढली होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, परळीकरांनी नेहमी मला भरभरून दिलं आहे. आजही त्यांनी भरभरून मदत केली आहे. एकीकडं राजकारणात जातीयतेचा रंग असताना, दुसरीकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातीपाती विसरून, जातीपाती धर्माच्या पलीकडे नागरिकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत. प्रत्येकांनी तिथं जाउन फोटो काढून बाईट देण्यापेक्षा अशी मदत करावी. असा सल्ला देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
प्रत्येक संकटात मदत
आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी सूचवलं मदत फेरी करुन पूरग्रस्तांना मदत करुया. माझ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
पूरग्रस्त भागात मी जाणार नाही, मदत पोहोचवणार
मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथे मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचं आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे. परिस्थिती खूप कठीण आहे, बिकट आहे. काही गावं मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभं करावं लागेल. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.