HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय यंत्रणाच्या रडारावर बारामती, छापेमारीला सुरुवात ….

बारामती | बारामतीत दोन ठिकाणी केंद्रीय यंत्रणांच्या पथकांनी आज, गुरुवारी सकाळीच शोधमोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिका-यांची भेटही होऊ न शकल्याने नेमकी ही शोधमोहिम कशासाठी सुरु आहे हेही निष्पन्न झालेले नाही. एका खासगी साखर कारखान्याशी संबंधित एका पदाधिका-याच्या घराबाहेरही हे अधिकारी ठाण मांडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी या बाबत नेमका खुलासा झालेला नाही.

पोलिसांनाही या छापेमारीबाबत फारशी कल्पना नसल्याचे पुढे आले

शहरातील एमआयडीसीतील एक बडी कंपनी तसेच तालुक्यातील काटेवाडी येथील एका व्यक्तीच्या घराची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी सुरु झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिका-यांनी ही चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.पोलिसांनाही या छापेमारीबाबत फारशी कल्पना नसल्याचे पुढे आले आहे. बारामतीत काल किरीट सोमय्या येऊन गेल्यानंतर आज लगेचच छापेमारी सुरु झाल्यानंतर याला काही राजकीय संदर्भ आहेत किंवा कसे या बाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! औरंगाबादमध्ये आज आणखी ६ जण कोरोनामुक्त

News Desk

पवार कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत !

News Desk

“पटेल स्टेडियमचे नाव बदलणाऱ्यांनी औरंगाबादच्या नामांतराबद्दल बोलू नये”, मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले

News Desk