HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात काल  2,876 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

मुंबई। कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2,876 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 67 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. राज्यात आज 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 929 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (15), नंदूरबार (1), धुळे (3), जालना (37), परभणी (87), हिंगोली (16), नांदेड (09), अकोला (22), वाशिम (07), बुलढाणा (01), नागपूर (97), यवतमाळ (05), वर्धा (6), भंडारा (1), गोंदिया (1), गडचिरोली (33 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यातील रुग्णसंख्या

राज्यात सध्या 33 हजार 181 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,39,760 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,416 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 96,19, 637 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण

मुंबईत गेल्या 24 तासात 621 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 540 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,636 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4519 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1131 दिवसांवर गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणे चाराण्यासारख्या गोष्टी करतात, सत्तारांची टीका

News Desk

माझ्या दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना जिल्ह्याचा दौरा करावा लागला !

News Desk

…असं असेल तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू!

News Desk