HW News Marathi
महाराष्ट्र

‘प्रताप सरनाईकांविरोधात सध्या कोणतीही कारवाई करु नका’, हायकोर्टाचा आदेश!

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचं सावट आहे. अशातच एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. प्रताप सरनाईकांविरोधात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करु नका, असा आदेश हायकोर्टाने ईडीला आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व कुटुंबीयांना २३ ऑगस्टपर्यंत दिलासा मिळालेला आहे. एनएसईएल आणि टॉप सिक्युरिटीज प्रकरणात सरनाईक यांची हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. याच प्रकरणी आता त्यांना २३ ऑगस्टपर्यंत दिलासा मिळालेला आहे.

सुनावणी महिनाभरासाठी तहकुब

प्रताप सरनाईकां बाबत आज कोर्टात सुनावणी होणार होती, पण न्यायालय सध्या परमबीर सिंग व रश्मी शुक्ला यांच्या याचिकांवर सुनावणी घेत आहे व ही सुनावणी आज दिवसभर चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज प्रताप सरनाईक यांच्या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही, असं सकाळी न्यायालयाने स्पष्ट केलं. ही सुनावणी महिनाभरासाठी तहकुब करण्यात आलेली आहे.

आता २३ ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालायाने जो सरनाईक कुटुंबीयांना अटकेपासून दिलासा दिलेला आहे, जो ईडीशी संबंधित टॉप सिक्युरिटीजच्या प्रकरणात होता. तोच हात एनएसईल प्रकरणातही लागू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दोन्ही प्रकरणांचा तपास एकच तपासयंत्रणेमार्फत सुरू आहे व दोघांचीह समान तपास सुरू आहे. दोन्ही प्रकरणी सरनाईक यांच्या याचिका कोर्टात प्रलंबित आहेत. त्यामुळे एका प्रकरणातील दिलासा त्यंना लागू राहणार आहे. अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना चांगलेच भोवणार असं दिसतं आहे. कारण, अंमलबजावणी संचनालयानं (ED) ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार त्यांनी ईडी कोठडी अहवाल केला आहे. या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले असून प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहे.

MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विनायक मेटेंनी मानले सरकारचे आभार 

News Desk

“…त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही” जयंत पाटलांचा टोला

Aprna

उद्धव ठाकरे म्हणतात, गडकरीजी महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज!

News Desk