HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्री WorkFromHome करू शकतात, सामान्यांना मात्र…”, भाजपचा खोचक टोला!

मुंबई। महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून आता लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबईकरांना कार्यालय गाठण्यासाठी लोकल ट्रेन हा स्वस्त आणि वेळ वाचवणारा असा पर्याय आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांसोबतच सामान्य नागरिकही करत आहेत. आता भाजपने सुद्धा तातडीने निर्बंध शिथील करुन लोकल प्रवासाची सर्वांना परवानगी देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

जनहिताचे निर्णय करणार का?

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलं, “आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री करू शकतात पण मुंबईकरांना ॲाफिसलाजावेच लागते. लोकलप्रवासबंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्यसरकारने तातडीने निर्बंध शिथील करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा”

अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच

त्यांनी पुढे म्हटलं, “मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळांअभावी वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.”

पाहणी दौऱ्यानंतरही मदत नाही…

“मुख्यमंत्र्यांनी तब्बल ‘दोन तासाचा’ प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी व दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी”, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धवजींनी जे केलं ते शरद पवार यांनाही मुंडे प्रकरणात करता आलं असतं – चंद्रकांत पाटील

News Desk

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांवर पोलिसांत तक्रार दाखल

News Desk

आदित्य ठाकरेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार ?

News Desk