HW News Marathi
महाराष्ट्र

…आता भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार?

मुंबई | भावना गवळी यांना 28 सप्टेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या समन्स नुसार भावना गवळी यांना आज 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. समन्सनुसार भावना गवळी यांना आज 11 वाजता ईडी कार्यलयात हजर रहायचं आहे. भावना गवळी आज ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर होतात की हजर राहण्यासाठी वेळ मागतात हे पुढच्या काही वेळेत स्पष्ट होईल. ईडीचं समन्स आल्यानंतर भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने 4 ऑक्टोबर म्हणजेच आज उपस्थित राहण्याचं समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला होता. खासदार गवळी आज ईडी चौकशीला हजर राहणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडाऱ्याच्या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, रोहित पवारांचा विश्वास

News Desk

Poladpur Bus Accident | मृतांच्या नातेवाईकांकडून सावंत-देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी

News Desk

खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून आता लोकलच्या फेऱ्या ५०० पर्यंत वाढवणार

News Desk