HW News Marathi
महाराष्ट्र

…अन् फडणवीस म्हणाले आम्ही वेटिंगवर राहात नाही!

मुंबई | राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या ३ पक्षांचं मिळून महाविकासआघाडीचं सरकार २०१९ ला स्थापन झालं. यानंतर प्रमुख विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपकडून अनेकवेळा सरकार पडेल असं वक्तव्य केलं. पण अजूनही ठाकरे सरकार कायम आहे. दरम्यान, २ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक वक्तव्य केलं होतं. चिपळूण दौऱ्यावर आले असता राणेंनी, मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही, असा हल्ला चढवतानाच राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत, असा उपरोधिक टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. यावरच आज (२७ जुलै) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आम्ही वेटिंगवर राहात नाही, असं सूचक विधान केलं आहे.

आम्ही वेटिंगवर राहात नाही

आज पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी त्यांना नारायण राणेंच्या या विधानाबद्दल विचारलं असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आम्ही वेटिंगवर राहात नाही असं उत्तर दिलं आणि हसून ते तिथून निघून गेले. त्यामुळे आता फडणवीसांच्या या विधानाचे तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहे. एकीकडे मनसे – भाजप युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून दुसरीकडे फडणवीसांच्या या विधानाने चर्चेला आणखी एक विषय दिला आहे.

आम्ही वेटिंगवर राहात नाही – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूणला पूरपरिस्थिती पाहून झाल्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज्यात पूरस्थिती आली आहे. त्यानंतर चार दिवसाने मुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले. हे कसले मुख्यमंत्री आहेत. मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही, असा हल्ला चढवतानाच राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत, असा उपरोधिक टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

आम्ही गेल्यावर शासकीय यंत्रणा जागी होते

‘पवार साहेबांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते.

दौरा मी येत्या ३ दिवसांत करणारचं

आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे पवार साहेबांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या ३ दिवसांत करणारचं आहे’, असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे – नारायण राणे

नारायण राणे हे चिपळूण दौऱ्यावर आहेत . तिथली पाहणी करून झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण..आल्यापासून वादळं काय? पाऊस काय? सर्व चालुच आहे. करोना काय? करोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा”, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

“पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.”, असा निशाणाही त्यांनी साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Budget 2021-22 : महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून महिलांसाठी खास भेट

News Desk

मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं!

News Desk

समविचारी पक्षांची लवकरच बैठक आयोजित करणार  ! –  के. चंद्रशेखर राव

Aprna