HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोन पोलीस रुग्णालयात दाखल

सांगली | सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे पुरग्रस्ताची पाहणी करत असताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आपल्या मतदारसंघातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणी करत असताना त्यावेळी अचानक गावातील एक माणूस आडवा आल्याने त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला होता.

यानंतर रस्त्याच्या पलीकडे जाऊन गाडीचा अपघात झाला. या अपघातात गाडीचे चालक आणि अन्य एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सुखरूप आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे दुसऱ्या गाडीत होते.

विश्वजीत कदम यांचे दौरे सुरुच

दरम्यान, विश्वजीत कदम हे सांगलीतील पूरग्रस्त भागांचे दौरे करत आहेत. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. आज अजित पवारांसह ते मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या भागातील पूरस्थितीची माहिती ते मुख्यमंत्र्यांना देतील. सांगली कोल्हापूरची पूरस्थिती आटोक्यात येतीय. आता धोका कमी होतोय. परिस्थिती आटोक्यात येतीय. लोकांना खूप चांगल्या प्रकारे रेस्क्यू करण्यात यश आलं. कोकणवासियांना मोठा फटका बसला. कोकणी बांधवांना आधार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं विश्वजीत कदम यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी विधेयकाला विरोध करणारे हेच ते दहशतवादी!

News Desk

‘राज ठाकरेंच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचा दुजोरा!’

Jui Jadhav

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम निर्णय जाहीर करू !

News Desk