HW News Marathi
महाराष्ट्र

‘बॅग भरुन कपडे आणा’, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज(२७ जुलै) ठाणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांची ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबईवरुन सकाळी ११.१५ च्या सुमारास ठाण्याकडे रवाना झाले. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बॅग भरुन कपडे आणण्यास सांगितलं. राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर हे बॅगा घेऊन कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

पदाधिकाऱ्यांची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज(२७ जुलै) ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे.या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

पुणे दौरा कायम

राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर सक्रियपणे कार्यरत आहेत. ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. राज ठाकरे २ ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील.राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune) हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान!

News Desk

“सत्तेसाठी लाचारी म्हणजे नारायण राणे”- विनायक राऊत

News Desk

अहमदनगर हत्याकांडाची केस फासट्रॅक कोर्टात चालवा

News Desk