HW News Marathi
महाराष्ट्र

पंचनामे होत राहतील,आधी शेतकऱ्यांना मदत करा, देवेंद्र फडणवीसांची मागणी!

नागपूर। जेव्हा अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.

चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही

दरम्यान, फडणवीस यांनी या आधी तीन ट्विट करून सरकारडे पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली होती. राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे, असं ते म्हणाले होते.

हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने

कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षव नाना पटोले यांच्या एका टीकेवर प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. नाना पटोले हे काहीही बोलत असतात. त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते अमेरिकेच्या अध्यक्षांवरही टीका करतील. त्यामुळे त्यावर बोललचं पाहिजे का?, असा सवालही त्यांनी केला.

आमचं सरकार असताना आम्ही हा आराखडा तयार केला होता

राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.यावेळी त्यांनी कोस्टल रोडचा आराखडा मंजूर झाल्याने समाधान व्यक्त केलं. कोस्टल रोडचा आराखडा मंजूर झाला हे चांगलं झालं. आमचं सरकार असताना आम्ही हा आराखडा तयार केला होता. मी स्वत: कोस्टल रोडसाठी प्रयत्न केला होता. कोस्टल रोडमुळे सिडकोमधील अनेक प्रकल्प मार्गी लागतील असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारून उद्योगपती मित्रांचा फायदा करून देत आहेत – नाना पटोले

News Desk

कोकणातील प्रकल्प लातूरला नेण्याच्या मागणीवरून शिवसेना खासदाराचा अमित देशमुखांना टोला

News Desk

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात अश्विनी भिंडेंची नियुक्ती

swarit