HW News Marathi
देश / विदेश

नेहरुंच्या शांतीदूत धोरणामुळेच देशाचं नुकसान,राज्यपालांची टीका

मुंबई | २६ जुलै, कारगिल दिवस निमित्त आयोजित ‘अशक्य ते शक्य’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक मोठं विधान केलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंना शांतीदूत बनावं असं वाटत असल्याने देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुचं होतं असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पत्नी आणि इतर जण उपस्थित होते.

काय म्हणाले राज्यपाल?

कारगिल दिवसानिमित्त राज्यपाल एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. “अटलबिहारी यांचा कार्यकाळ सोडून दिला तर त्याआधी वाटलं की देशाच्या सुरक्षेबाबत लोकांचं लक्ष खूप कमी आहे. मी पंडित जवाहरलाल नेहरुंचा खूप आदर करतो. पण कदाचित त्यांची कमजोरी होती की त्यांना वाटयचं की शांतीदूत बनावं, कबूतरं उडवावी. यामुळे देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुचं होतं. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्बची चाचणी केली. तो अणुबॉम्ब २० वर्षापासून तसाच ठेवला होता. सरकार घाबरायचं पण आमच्या वाजपेयीजींनी चाचणी घडवून आणली. जगाने आपल्यावर निर्बंध आणले पण अटलजींना आपल्या देशातल्या नागरिकांवर विश्वास होता. मी आपल्या सैनिकांदेखील सांगतो जसा आम्हाल तुमच्यावर विश्वास आहे तसाच तुम्हालाही आमच्यावर विश्वास असायला हवा की देश तुमच्या सोबत आहे,” असे राज्यपालांनी यावेळी म्हटलं आहे.

मोदींच्या हातात देश सुरक्षित

मोदींच्या हातात देश सुरक्षित आहेत असं राज्यपालांचं म्हणणं आहे. “त्रिशूलमध्ये असताना विमानतळ सुरु नसल्याचे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण कालपरवा बातमीतपत्रात पाहिलं की लडाखमध्ये ४ विमानतळं उभी राहत आहे. मला वाटलं की मला पद्मविभूषण मिळत आहे. कारण सीमेवर हे गरजेचं आहे. हे इतकं वर्ष झालं नाही पण आता मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे,” असे राज्यपाल म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची वर्णी लागणार ?

News Desk

#Lockdown2 : २० एप्रिलनंतर देशातील ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन शिथील होणार

News Desk

परदेशात २७६ भारतीयांना कोरोनाची बाधा, एकट्या इराणमध्ये २५५ भारतीय रुग्ण

swarit