HW News Marathi
महाराष्ट्र

उर्मिलांकडून पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, “पंकजा म्हणाल्या चला भेटू…”

मुंबई | राजकारणात मतभेद, हेवेदावे , वादविवाद हे सगळं सुरूच असतं. त्यात महाविकासआघाडी आणि भाजप मध्ये कायम खटके उडत असतात. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज(२६ जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा येत आहेत. शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील पंकजा मुंडेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

चला भेटूया…

उर्मिला मातोंडकर यांनी पंकजा मुंडेंना ट्विटर वरून शुभेच्छा दिल्या आहेत. याच ट्विटला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं आहे. “भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!” असे ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी दुपारच्या सुमारास केले. त्यावर “धन्यवाद, फारच गोड. आपण भेटलं पाहिजे” अशी प्रतिक्रिया पंकजांनी दिली. त्याला “कधीही, माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे” असं उत्तर उर्मिला यांनी दिलं आहे.

प्रीतम मुंडेंकडून खास शुभेच्छा

प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातलं प्रेम आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. प्रीतम मुंडे यांनी आपल्या बहिणीला विशेष शशुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रीतम ट्विटमध्ये म्हणतात- ‘5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’.

एकाही भाजपच्या नेत्याचा फोटो नाही

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्विकारलेले नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

News Desk

‘महाराष्ट्रातच नाही इतर राज्यातही ईडीचा गैरवापर!’ शरद पवारांची टीका

News Desk

“…तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल’’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

News Desk