HW News Marathi
देश / विदेश

‘सायकलवर फिरून कर्नाटकात…”, येडियुरप्पा राजीनामा देताना झाले भावुक

कर्नाटक | कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी आज (२६ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्य़ापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे आजच त्यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी येडियुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होत नाही तोवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं आहे.

येडियुरप्पा झाले भावुक

राजीनामा देताना येडियुरप्पा हे भावुक झाले होते. तसंच या दोन वर्षांच्या कार्यकाळात आपली सातत्यानं परीक्षा झाली असल्याचं म्हटलं. “ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा मला त्यांनी केंद्रात मंत्री बनण्यास सांगितलं होतं. परंतु मी त्यांना नकार दिला आणि कर्नाटकातच राहणार असल्याचं म्हटलं होतं,” असं येडियुरप्पा म्हणाले आहेत.

“मी आपल्या राजकीय जीवनात कायमच अग्निपरीक्षा दिली आहे. जेव्हा कार नव्हत्या तेव्हा मला आठवतंय की मी दिवसभर सायकल चालवून पक्षासाठी काम करत होते. शिमोगाच्या शिकारीपुरामध्ये ठराविकच कार्यकर्त्यांसोबत मी भाजप पक्ष उभा केला. तेव्हा कोणीही नव्हतं. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावं अशी माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली,” असंही त्यांनी नमूद केलं.

येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२६ जुलैला येडियुरप्पा सरकार दोन वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बीएस येडियुरप्पा यांनी भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही स्थगिती दिली आहे. येत्या रविवारी एका आलिशान हॉटेलमध्ये डिनर आयोजित करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात बीएस येडियुरप्पा यांनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यावेळी मात्र येडियुरप्पांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग नवाब मलिक तुम्हीही मंत्रिपदाचा राजीनामा द्या”, दरेकरांचं आव्हान

News Desk

मोदींचे शेतकरी बांधवांना आवाहन….

News Desk

अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

News Desk