कर्नाटक | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आज (२६ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू, असं त्यांनी कर्नाटक सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात सांगितलं. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती.
आधीच संकेत दिले होते
बीएस येडियुरप्पा यांनी राजीनाम्याचे संकेत आधीच दिले होते. बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. “२५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा” असं वक्तव्य बीएस येडियुरप्पा यांनी केलं होतं.
I have decided to resign. I will meet the Governor after lunch: Karnataka CM BS Yediyurappa at a programme to mark the celebration of 2 years of his govt pic.twitter.com/sOn0lXAfeD
— ANI (@ANI) July 26, 2021
येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२६ जुलैला येडियुरप्पा सरकार दोन वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बीएस येडियुरप्पा यांनी भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही स्थगिती दिली आहे. येत्या रविवारी एका आलिशान हॉटेलमध्ये डिनर आयोजित करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात बीएस येडियुरप्पा यांनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यावेळी मात्र येडियुरप्पांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.