HW News Marathi
महाराष्ट्र

“तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस…”, बहिणीच्या पंकजांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा      

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज (२६ जुलै) वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसासाठी कार्यकर्ते वाटेल ते करतात. पंकजा मुंडे यांना विशेष शुभेच्छा त्यांच्या धाकट्या बहीण आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी दिल्या आहेत. प्रीतम मुंडे यांनी त्या दोघींचा एक फोटो शेअर करत विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. मुंडे भगिनिंचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस

प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातलं प्रेम आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. प्रीतम मुंडे यांनी आपल्या बहिणीला विशेष शशुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रीतम ट्विटमध्ये म्हणतात- ‘5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’.

पंकजा मुंडेंच्या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो नाहीत!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज (२६ जुलै) वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या नेत्यासाठी काहीही करायला कार्यकर्ते सज्ज असतात.

त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी राजीनामे देखील दिले जे पंकजा मुंडेंनी रद्द केले. त्यांची नाराजी पुन्हा एकदा दिसून आली आहे.

बॅनर वर एकही भाजप नेते नाहीत

माझे नेते मोदी आणि शाह, पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे.

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची नाराजी

पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. यानंतर आता पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरुन समर्थकांनी नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर राज्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं होते. पण यानंतर खुद्द पंकजा मुंडे यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला होता.

एकाही भाजपच्या नेत्याचा फोटो नाही

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्विकारलेले नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उठसूठ शरद पवारांवर बोलणार्‍या गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीने घेतला समाचार

Manasi Devkar

नवाब मलिक याचं ट्विटर वॉर सुरूच, वानखेडेंवर पुन्हा हल्लाबोल!

News Desk

आज स्त्री शिक्षणाचे दालन खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची जयंती

News Desk