HW News Marathi
महाराष्ट्र

‘भास्कर जाधव, कोकणी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’, मनसेचा इशारा

मुंबई | राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी गाजवले. पुन्हा एकदा राज्यातील पुरग्रस्त परिस्थितीमुळे शिवसेना आमदार भास्कर जाधव हे चांगलेच चर्चेत आले आहेत ते त्यांच्या उद्दामपणामुळे. मदत पूरग्रस्त भागात मदतीची याचना करणाऱ्या महिलेशी त्यांनी उद्दामपणे केलेली वागणूक आणि त्यासंदर्भातला व्हीडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यावेळी एक महिला आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत होती. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या महिलेला दिलेल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर टीका होते आहे. आता मनसे्च्या नेत्या शालिनी ठाकरे यांनीही भास्कर जाधव यांच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे.

काय म्हटलं आहे शालिनी ठाकरेंनी?

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिलाय. “भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असं शालिनी ठाकरे म्हणाल्या आहे

काय घडलं होतं?

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एका दुकानासमोर जाऊन पीडित जनतेशी संवाद साधत होते. त्याचवेळेस एका दुकानासमोर आले असता तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं लक्ष त्या महिलेकडे गेलं. मुख्यमंत्र्यांना आपली व्यथा सांगताना या महिलेच्या डोळ्यातले अश्रू काहीकेल्या थांबत नव्हते.

पीडीत महिला म्हणाली, ‘तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या;. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत असतानाच आमदार भास्कर जाधव मध्ये पडले. महिला मुख्यमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडत असताना…भास्कर जाधवांनी महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. ‘हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय? अरे आईला समजव…आईला समजव…उद्या ये’, असं भास्कर जाधव बोलले. त्यांचा हाच व्हीडिओ आणि त्यामध्ये केलेलं उद्दाम वर्तन हा टीकेचा विषय ठरतो आहे.

मनसेने आता कोकणी माणूस तुम्हाला जागा दाखवेल असं म्हणत भास्कर जाधव यांना इशाराच दिला होता.पूरग्रस्त महिला अत्यंत कळकळीने मुख्यमंत्र्यांना तिची व्यथा सांगत होती आणि मदतीसाठी याचना करत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत शांतपणे तिला समजावत होते त्याचवेळी भास्कर जाधव मधे पडले आणि त्यांनी या महिलेशी उद्दाम वर्तन केलं. याचा सोशल मीडियावर तीव्र निषेध नोंदवला जातो आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है”, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्ला

News Desk

‘मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी’ -विनायक मेटे

News Desk

राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, राजेश टोपेंच्या बैठकीत निघाला तोडगा

News Desk