HW News Marathi
महाराष्ट्र

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’….. आणि अजित पवारांचा चढला पारा

बारामती। उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बेधडक आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. सर्वसामान्य असो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो किंवा विरोधक, आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त बोलायचं… मग समोरच्याला राग येऊ किंवा लोभ…. याची फिकीर करायची नाही, असा दादांचा स्वभाव.. एव्हाना हा स्वभाव आता बारामतीकरांनाच नव्हे तर महाराष्ट्राला माहिती झालाय. आज बारामतीमधल्या एका कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन अजित पवारांचा पारा चढला. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं आहे.

अजित पवारांचा पारा वाढला

अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांना अनेक लोक भेटायला येतात आणि आपल्या अडचणी सांगतात. आज(२५ जुलै) सकाळी बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे अजित पवारांचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजित पवारांकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन त्याने अजित पवारांना दिलं आहे.

‘माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावं’, अशी विनंती संबंधित व्यक्तीने अजितदादांकडे केली. निवेदन पाहून अजितदादा भडकले. त्यावर ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात संबंधित व्यक्तीला सुनावलं आहे.

बेकायदेशीर कामं करू नका

अजित पवारांनी आलेल्या व्यक्तीला एक महत्वाचा सल्ला दिला आह। ‘बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल’, असा सज्जड दम अजितदादांनी यावेळी दिला. ‘चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही’, असं अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं – किरीट सोमय्या 

News Desk

मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकर यांचे वर्चस्व

Aprna

राज्यपाल काय राज्य चालवतात का? विरोधकांना भेटायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटा

News Desk