HW News Marathi
महाराष्ट्र

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजपा वचनबध्द – प्रविण दरेकर

मुंबई।देशातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कटीबध्द आहे. परंतु भाजप हा अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचा अपप्रचार राजकीय विरोधक नेहमी करतात. परंतु राजकीय विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरीही भाजपा खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी वचनबध्द असल्याचा निर्वाळा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

प्रशिक्षण पध्दतीला भाजपमध्ये अनन्य साधारण महत्व आहे

भाजप महाराष्ट्र अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने आज उत्तन येथे प्रदेश प्रशिक्षण वर्ग आणि कार्यकारिणी बैठक विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, आजच्या कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने आपल्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पध्दतीला भाजपमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक क्षेत्रात तसेच राजकारणातही प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सर्वप्रथम भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी अभियान सुरू करण्याची आवश्यकता आहे. या समाजाच्या प्रलंबित समस्या, त्यांच्या अडचणी दूर करुन त्यांच्या विकासासाठी काय केलं पाहिजे, त्याचा निश्चित आराखडा तयार करण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी ३-४ टीम करून या सर्व गोष्टींचा आढावा दर ३ महिन्यांनी घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

आज महाराष्ट्राचे नेते केंद्रात मंत्री आहेत

भाजापा महाराष्ट्राच्या अल्पसंख्यांक मोर्चाने पुढाकार घेतला पाहिजे, बेरोजगार तरुणांना दिशा देण्याची जबाबदारी आमची आहे. विद्यार्थी, तरूणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धती काम करत आहे हे नीट समजून सांगण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आदराचं स्थान आहे. आज महाराष्ट्राचे नेते केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यातून सुद्धा आपल्याला विकास, उद्योग धंदे कसे उभारता येईल याचे प्रशिक्षण करण्याची आवश्यकता आहे. असेही दरेकर यांनी सांगितले.यावेळी भाजापा महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इजाज देशमुख, भाजपा मुंबईचे महामंत्री संजय उपाध्याय, मुंबई अध्यक्ष वसीम खान, महाराष्ट्राचे महामंत्री जुनेद खान, अतिक खान, अल्पसंख्याक मोर्चाच्या महिला अध्यक्षा सुलताना खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महावेध” प्रकल्पाकडे महाराष्ट्र कृषी विभागाचे दुर्लक्ष

Adil

नांदेडचा महापौर बाहेरचा मंत्री येऊन ठरवणार का ? नांदेडचा महापौर हा नांदेडची जनताच ठरवणार.

News Desk

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे !

News Desk