HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स!

मुंबई।शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना सक्तवसुली संचनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून संघर्ष सुरू आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसूळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे.ईडीने आज सकाळी ८ च्या सुमारास अडसूळ यांना समन्स पाठवले आहेत. तसंच, चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे अशी सूचनाही करण्यात आली होती. ईडीने बजावलेल्या या समन्सवर अडसूळ यांनी उत्तर दिल्याचं कळतंय.

विरोधकांवर टीका केली होती

आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती रवी राणा यांनी दिली होती. मात्र, आनंदराव अडसूळ यांना कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. ही रवी राणा यांनी पेरलेली माहिती आहे, असं आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी अडसूळ यांनी ही चर्चा फेटाळून लावत असं काहीही झालं नसल्याचं सांगत विरोधकांवर टीका केली होती. तसंच, रवी राणा यांच्यावर जोरदार टीकाही केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात नोटाबदलीच्या रॅकेटमधील 5 पोलिसांवर बडतर्फीची कारवाई

News Desk

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवा, कोळी भगिनींची राज ठाकरेंकडे साद

News Desk

“आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा वेळकाढूपणा”, देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून घणाघात!

News Desk