HW News Marathi
महाराष्ट्र

चिपळूणमध्ये महापूराचा कहर, कोव्हिडसेंटरमधील व्हेंटिलेटरवरील ८  रुग्णांचा मृत्यू

चिपळूण | महाराष्ट्राला चारही बाजूंनी पावसाने आणि त्याने आलेल्या पुराने घेरलं आहे. या पुराचा कहर कोव्हिड रुग्णांच्या जीवावर बेतला आहे. चिपळूणमधील कोव्हिडसेंटरमधील ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर विविध ठिकाणी पुरात बुडाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे या हॉस्पिटलमध्ये एकूण २० रुग्ण होते. त्यापैकी ८ जण दगावले असून १२ जणांना शासकीय रुग्णालय आणि इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गेल्या १-२ दिवसांपासून कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोकणात अनेक भागात पूर आला आहे. चिपळूणमधील कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्येही काल संध्याकाळी पाण्याचा मोठा लोट आला. त्यामुळे संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी आणि चिखल झाला. त्यामुळे या कोविड सेंटरमधील वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या 8 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्याने संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी झाले. त्यामुळे स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन रुग्णांना पटापट बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मात्र, कंबरेभर पाणी, अंधार यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या कोविड सेंटरमध्ये जनरेटर होते. पण कुणालाही जनरेटर चालू कसं करायचं माहीत नव्हतं. त्यामुळे कोविड सेंटरमधला वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही. परिणामी व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा होता. एकूण ३० सिलेंडर रुग्णालयात होते. पण जनरेटरवर पाणी गेल्यामुळे जनरेटर बंद झालं आणि मॉनिटरवर त्याचा परिणाम झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गारपीठीने शेतकरी आडवा झालाय…”; पंचनामे न करण्यावरून अजित पवार आक्रमक

Chetan Kirdat

एका संजयची बाजू दुसरा संजय पूर्णपणे सांभाळून घेत आहे!

News Desk

राज्यातील एकपडदा थिएटरचालकांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र, पुन्हा थिएटर सुरु करण्याची केली मागणी

News Desk