HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसचे खासदार शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित!

नवी दिल्ली | संसेदचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे मांडण्यात येत आहेत, पण महत्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे पेगाससचा. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे शांतनू सेन अधिवेशनाला मुकणार आहेत. शांतनू सेन यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस प्रकरणावर निवेदन देत असताना त्यांच्या हातातून निवेदनपत्र खेचून घेत फाडलं होतं. यानंतर भाजपाने शांतनू सेन यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. दरम्यान व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांचं निलंबन केलं आहे.

नेमकं काय घडलं?

पावसाळी अधिवेशनात विरोधक खूप गोंधळ घालताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री वैष्णव बोलायला उभे राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती वंकैय्या नायडू यांनी विरोधकांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना आपलं वक्तव्य सदनाच्या पटलावर ठेवण्याची विनंती केली. “खासदारांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही असंच दिसतंय.”, असं मत वंकैय्या नायडू यांनी मांडलं. गोंधळामुळे शून्यकाळ आणि प्रश्नकाळही चालू शकलेला नाही. “विरोधी पक्षातील काही जण, विशेषत: तृणमूल काँग्रेसचे खासदार उठले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा्या हातातून पेपर घेतला आणि तो फाडून टाकला. असं वागणं खरंच दुर्दैवी आहे.”, असं मत भाजपा राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी नोंदवलं आहे.

काय आहे पेगासस?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PV सिंधू विजयी, भारताला दुसऱ्या दिवशीही यश!

News Desk

प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Manasi Devkar

सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्तपदी विराजमान 

News Desk