HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसणार? पूरपरिस्थितीच्या सुटकेसाठी नेव्ही,आर्मी सज्ज..!

कोल्हापूर। मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रत्नागिरी, चिपळूण, रायगडमध्ये भीषण संकट आल्या नंतर आता कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज संध्याकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याने कोल्हापूरला पुराचा आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरपरिस्थितून नागरिकांची सुटका करण्यासाठी नेव्ही आणि आर्मीलाही सज्ज करण्यात आलं आहे.

2019 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सरासरी 150 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज रात्रीपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटावर जाण्याचा अंदाज आहे. दुर्देवाने जिल्ह्यात 2019 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच गरज भासल्यास एनडीआरएफच्या आणखी दोन टीम जिल्ह्यात मागवण्यात येणार आहे, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.

कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू आहे

आज संध्याकाळपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील. याचा फटका काही प्रमाणात बसणार आहे. भयावह पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू आहे. अलमट्टी धरणातून नियोजनबद्ध पाणी सोडलं जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-बंगलोर महामार्गावरील कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या महामार्गावरील एकच लाईन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसामुळे अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासन मदत करेल. किमान 24 तास प्रवाशांना थांबावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.

नेव्ही आणि आर्मी होल्डवर

हॉस्पिटलमध्ये अडकून पडलेल्या सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना शहरातील इतर हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सध्या नेव्ही आणि आर्मी यांना होल्डवर ठेवला आहे. गरज वाटल्यास त्यांना ही बोलावू. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांना पूरपरिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. आवश्यक ती मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती गंभीर आहे. पावसाने आता जरी थोडीफार विश्रांती घेतली असली तरीसुद्धा ज्या गावांना पुराचा धोका आहे तिथल्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावं. जनावरांसह स्थलांतरासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. सांगलीतल्या आयर्विन पुलाची पाणी पातळी सुद्धा वाढताना दिसत आहे. जवळपास 45 फुटांपर्यंत पाणी आलेलं आहे. तिथे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होऊन, प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिष देशमुख यांच्या हाती आता काँग्रसेचा झेंडा

swarit

शरद पवारांचा खडसेंच्या भेटीवर खुलासा!

News Desk

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

News Desk