मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात आता कोरोना रुग्ण होत असताना देखील सरकार अद्याप लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाची मोहीम राज्यात जोमाने सुरु असून अनेक लोकांनी लसीचा दुसरा डोस सुद्धा घेतला आहे. ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे त्यांना बाहेर मुक्तपणे फिरण्याची मागणी आता साकडे होत आहे.
‘कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का?’, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज(२२ जुलै) महाविकास आघाडी सरकारला केला आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फडणवीसांना पुन्हा संधी मिळायला हवी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला सूख देण्यासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना आगामी काळातही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत.
निर्बंधातून सवलत देण्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ‘अजित पवार आणि राजेश टोपे यांच्याप्रमाणेच आपले मत आहे. आपण ते आधीपासूनच व्यक्त केले आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी व्यवहार खुले करावेत. जनजीवन बंद ठेऊन चालणार नाही, परिस्थितीला सामोरे जावे लागेलच. अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का ?
नेत्यांना अडचणीत आणू नका
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांच्या वाढदिवसासाठी होर्डिंग्ज लावू नका असं सांगितलं असताना त्यांच्या चाहत्यांनी होर्डिंग्ज लावत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदा होर्डिंग्ज लाऊन नेत्यांना अडचणीत आणू नका आणि आचारसंहिता पाळा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईचे त्यांनी समर्थन केले आहे.
चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण
मुंबई सह कोकणात २४ तासांत मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे ढगफुटी होऊन गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथे तातडीने मदत पाठवून जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. राज्याच्या अन्य काही भागातील पूरस्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहकाराविषयी जो निकाल दिला आहे तो तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्या केंद्र सरकारने केलेल्या घटनादुरुस्तीबाबत आहे. या निकालामुळे मोदी सरकारला धक्का बसला असे म्हणणे चुकीचे आहे. मोदी सरकारने निर्माण केलेल्या नव्या सहकार मंत्रालयाचा आणि या घटनादुरुस्तीचा काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.