HW News Marathi
देश / विदेश

परळीतील चक्काजाम आंदोलनादरम्यान खासदार प्रीतम मुंडे पोलिसांच्या ताब्यात

बीड | OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष असलेला भाजप अत्यंत आक्रमक झाला असून भाजपने राज्यव्यापी चक्काजामची हाक दिली आहे. आज (२६ जून) राज्यभर भाजपचे सर्व बडे नेते आरक्षणाच्या मुद्द्यासाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र रोष व्यक्त करत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुण्यात चक्काजाम केल्यानंतर परळीमध्ये देखील खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम देखील आंदोलन सुरू होते. मात्र, थोड्याच वेळापूर्वी प्रीतम मुंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परळी शहरातील इटके टी कॉर्नरवर तब्बल २ तासांच्या चक्काजाम आंदोलनानंतर आता प्रीतम मुंडेंना पोलिसांनी तब्येत घेतल्याची माहिती मिळत आहे.

चक्काजामला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले होते. बीड जिल्ह्यात तब्बल 24 ठिकाणे चक्का जाम आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चक्काजामनंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र असेल, असा इशारा देखील खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला होता.

परळी शहरातील इटके टी कॉर्नरवरील चक्काजाममुळे एक तास वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसून मनस्ताप सहन करावा लागला. चक्काजाम आंदोलनाच्या वेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचा नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज, मराठा समाज, यांच्या आरक्षणा संदर्भात अडचण निर्माण झाले आहेत. एवढं होत असतांना हे सरकार प्रत्येक प्रश्नासंदर्भात केंद्राकडे बोट दाखवतय. जर केंद्राकडे बोट करायचचं असेल तर महाराष्ट्राचा केंद्रशासित प्रदेश करायचा आहे का ? असा प्रश्न देखील खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधार क्रमांकाद्वारे पॅन क्रमांक मिळवणे होणार शक्य

swarit

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

अॅट्रॉसिटी कायद्या | आज दलित-आदिवासी संघटनांची ‘भारत बंद’ची हाक

News Desk