HW News Marathi
देश / विदेश

“……. तर केंद्र सरकार लवकरच कोसळणार”, माजी मुख्यमंत्र्याचा इशारा

गाझियाबाद | कृषी विधायकाविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनात सहभागी झालेले हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी एक मोठा विधान केलं आहे. भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहण्याचं आश्वासन दिलं. त्याचसोबत संपूर्ण देशभरात इंडियन नॅशनल लोकदल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करेल असंही ओम प्रकाश चौटाला यांनी इशारा दिला आहे.

केंद्र सरकार लवकरच कोसळणार

चौटाला यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे. आज पूर्ण देश कृषी विधेयकाच्या विरोधात उभा आहे. शेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत. केंद्र सरकार अल्पमतात येईल. सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील असा दावा त्यांनी केला आहे.

संसदेत पोहचून खासदारांना जागं करणार

भारतात कृषी कायदे रद्द व्हावे म्हणून सगळीकडे आंदोलनं सुरु आहेत. जर कायदे मागे घेतले नाहीत तर, शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा. ओमप्रकाश चौटाला यांच्या पाठिंब्यानं नवी उर्जा मिळाली आहे. यूपी गेटवर किसान शहीद स्मृती दिवस साजरा केला जाईल. २१ जुलै १९८० मध्ये कर्नाटकात फायरींग झाली होती त्यात २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृती जागवण्यात येतील असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले आहेत.

शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीत

कृषी कायदे मागे घेण्यासाठी काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी तर परत जाणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. ५ सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. सरकारने नाही ऐकलं तर देशात युद्ध होईल असं वाटतंय” असे राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे १६८ जणांचा मृत्यू

News Desk

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

News Desk

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरमध्ये दाखल

News Desk