ठाणे। कोरोना संकटामुळे यंदा आषाढी वारीचा पारंपरिक सोहळा पार पडू शकला नसला तरी राज्यभरात आज भक्तीमय वातावरण पाहायला मिळालं. ठाण्यात पालकमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसमवेत टाळ, मृदुगांच्या तालात विठुरायाचा गजर केला. ठाण्यातील नौपाडा भारात तब्बल 10 वर्षानंतर वारकऱ्यांना त्यांच्या हक्काचं वारकरी भवन मिळालं आहे. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाण्यात वारकरी भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. या भवनाचं उद्घाटन आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी वारकऱ्यांसोबत एकनाथ शिंदेही भजनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं.
‘वारकरी भवनाचे लोकार्पण करताना तीच इच्छा पूर्ण केल्याची अनुभूती मिळाली. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा संघ, ठाणे यांनी गेल्या १० वर्षांपासून शहरात हक्काचं वारकरी भवन असावं अशी मागणी केली होती, याप्रसंगी सेवा संघाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. खासदार राजन विचारे आणि महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर,नगरसेविका नंदिनी विचारे,शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे,ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी,वारकरी संप्रदायातील ठाणेकर उपस्थित होते’, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
#आषाढी_एकादशी चे औचित्य साधून @TMCaTweetAway वतीने उभारण्यात आलेल्या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
स्व.#हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे तसेच स्व.गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे साहेब यांची देखील शहरात वारकरी भवन असावे अशी इच्छा होती. pic.twitter.com/QrItkyIyWb
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2021
विठ्ठलाची शासकीय महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.