HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने देशातील पहिल्या ‘एलजीबीटी’ सेलची केली स्थापना

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने आज देशातील पहिला ‘एलजीबीटी सेल’ स्थापन केला असून या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली.राष्ट्रवादीने देशात पहिल्यांदा युवती संघटनेचा प्रयोग केला आणि आता ‘एलजीबीटी सेल’ स्थापन करुन या वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. याचा विचार राष्ट्रवादीने केला आहे शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. एलजीबीटी सेलची आज स्थापना झाली असून प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एलजीबीटी वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे.यातून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल शिवाय आम्ही निवडणूक काळात जाहीरनाम्यात जे काही जाहीर केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार सुळे आणि प्रिया पाटील यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष आहे ज्याने युवती संघटना स्थापन केली आणि आता ‘एलजीबीटी’ सेलची स्थापना करत आहे. देशातील असा पहिला पक्ष आहे. जो भाषणापुरता नाही तर कृती करणारा पक्ष आहे असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. मिशन मोडमध्ये वेल्फेअर बोर्ड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत !

swarit

“मतदानाची वेळ येईल तेव्हा लोक भाजपच्या….”, जयंत पाटील म्हणाले….

News Desk

शिवसेनेच्या गुजराती मेळाव्याच्या भूमिकेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk