HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका, बंडातात्या कराडकरांची खोचक विनंती

पंढरपूर | आषाढी एकादशी उद्या (२० जुलै) असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मागिल वर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता वारीला परवानगी दिली नाही. यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय नाराज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कारडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून पांडुरंगाच्या पूजेला येण्याचा टाळावं

पायी वारीसाठी परवानगी नाकारल्याने संपूर्ण वारकरी समुदाय नाराज झाला आहे. अनेक जण आपल्या प्रतिक्रिया मांडत आहेत आणि ठाकरे सरकारला बोल लावत आहेत. बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून पांडुरंगाच्या पूजेला येण्याचा टाळावं. ज्या पद्धतीने गेले चार महिने वारकऱ्यांचे आंदोलन गुंडाळण्यात आली त्यावरून महाराष्ट्रात भगव्या झेंड्याच राज्य आहे, असे वाटत नाही. भगव्या झेंड्याचा अपमान सुरू असून, वारकऱ्यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात. वारकऱ्यांच्या पोशाखात चालू नका असा पोलीस दम देतात. दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे आपण रद्द केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नाही.”, असं देखील ते म्हणाले.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच विरोधी सरकारवर टीका करत असतात. पंढरपूरच्या पायी वारीवर जाण्यास निर्बंध लावले म्हणून आता पडळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. संतांचा व भगव्या ध्वजाचा पदोपदी अपमान व अनादर होत असताना आपल्या हातून होत असलेली महापुजा पांडुरंगाला मान्य होणार नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी महापुजेला येण्याचे टाळावे, असे मत जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केले.

पांडुरंगाची महापूजा करण्याचा थाट घालायचा हा काशासाठी?

एका बाजूला मुख्यमंत्री सर्व संतांच्या पालख्या पायी जाण्याची प्रथा मोडून काढायची. पालखी बरोबर फक्त 50 लोक जाऊदेत, अशी विनंती करूनही. ती विनंती धुडकाऊन लावली. त्याचप्रमाणे वारीत कोणाला पायी चालूही द्यायचं नाही. जी माणसं पायी चालतात त्यांच्यावर दहशतवाद करायचा. वारकऱ्यांची पताका, चिपळी हिसकावून घ्यायची, तसंच त्या वारकऱ्याला धोतराच्या पोशाखात चालू का, अशी ताकीदही द्यायची. आणि दुसऱ्या बाजूला पांडुरंगाची महापूजा करण्याचा थाट घालायचा हा काशासाठी?, असा सवाल कराडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातच चोरी, प्रशासनासमोर नवे आवाहन

News Desk

नारायण राणेंची तब्येत बिघडली!

News Desk

मनसेच्या गजानन काळे यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा!

News Desk