HW News Marathi
व्हिडीओ

‘अखेर चंद्रकांत पाटलांचा ‘राज योग’,नेमकी काय झाली चर्चा..!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.योग असेल तर राज यांची भेट घेऊ,असे चंद्रकांत पाटील म्हणाले, आणि सकाळीच ‘राज योग’ जुळून आला. राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर, चंद्रकांत पाटील हे देखील नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी या दोन्ही नेत्यांची नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्राम गृहाबाहेर जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज यांना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच 15 मिनिटं चर्चा झाली. या वेळी चर्चा नेमकी कशावर झाली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. या उभ्याने झालेल्या भेटीमुळे मनसे-भाजप युतीबाबत पुन्हा अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.

#ChandrakantPatil #RajThackeray #Nashikmahapalika #Hwnewsmarathi #MNS #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत Asaduddin Owaisi मराठा आरक्षणावरून संतापले!

News Desk

Uddhav Thackeray यांच्या दीर्घायुष्यासाठी पायी यात्रेला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू

News Desk

“बाळासाहेब युतीतून बाहेर पडणार होते, राष्ट्रवादीला प्रस्ताव होता”; Nawab Malik यांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk