HW News Marathi
महाराष्ट्र

‘दोन महिन्यानंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद,’कोल्हापूरकरांना दिलासा!

कोल्हापूर। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला कोरोनाच्या च्या संकटातून मोठा दिलासा मिळालेला आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण संख्येची आता नोंद झाली आहे तर मृत्यूची संख्या देखील घटली आहे. शासन आणि प्रशासनाच्या कठोर परिश्रमानंतर आणि मेहनतीनंतर कोरोनाला थोड्या प्रमाणात का होईना कोल्हापूरकरांना पायबंद घालण्यात यश आलंय.

दोन महिन्यात ही सर्वांत कमी रुग्णवाढ

मागच्या चोवीस तासांत जिल्ह्यात 938 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत तर 18 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या दोन महिन्यात ही सर्वांत कमी रुग्णवाढ आहे तर मृत्यूची संख्या देखील घटत चालली आहे. दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे गगनबावडा तालुका कोरोना मुक्त झालाय. रुग्ण वाढ आणि मृत्यू कमी होत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळालेला आहे.

कोरोनाला हरविण्याचा मंत्र

दररोज अधिक प्रमाणात होणाऱ्या टेस्टिंगमुळे संसर्गाचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे तसेच जास्त टेस्टिंग झाल्याने लक्षण नसलेले लोकसुद्धा (असिम्टमॅटिक पेशंट) मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे देखील संसर्ग रोखला गेला. शिवाय टेस्टिंगमुळे सौम्य लक्षण असणाऱ्यांना सुद्धा वेळेत उपचार मिळाले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील घटलेलं पहायला मिळत आहे. दुसरीकडे लसीकरण देखील जोरात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. लसीचा पुरवठा कमी झाला तरच लसीकरणात व्यत्यय येतोय नाहीतर एरव्ही लसीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

केंद्रिय पथकाचा दौरा

केंद्राच्या पथकाने 15 जुलैला कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. पथकाने जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला. चार सदस्यीय पथकाने प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, लसीकरण केंद्रांना देखील भेटी दिल्या. रोजचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू बेडची स्थिती, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, तिसर्‍या लाटेसाठी केलेली तयारी याची सविस्तर माहिती प्रशासनाने या पथकाला दिली.

टोपेंचा कोल्हापूर दौरा

कोल्हापूरची कोरोना स्थिती आटोक्यात येत नसल्याचे पाहून अनेक जण चिंता व्यक्त करत होते. प्रत्यक्ष आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून आरोग्य यंत्रणे करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच काही त्रुटी दूर करून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई; भिंतीत १० कोटींची रोकड, १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या

Aprna

राज्यात मेगा टेक्स्टाईल प्रकल्पला मिळाली मंजूर; उपमुख्यमंत्र्यांकडून माहिती

Aprna

#Vidhansabha2019 : कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष

News Desk