टोकयो | सगळ्या जगाचं लक्ष लागलेल्या आणि पुढच्या आठवड्यापासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक-२०२० स्पर्धेत करोना विषाणूनं प्रवेश केला आहे. २३ जुलैपासून म्हणजेच स्पर्धा आठवड्यावर येऊन ठेपलेली असतानाच ऑलिम्पिक क्रीडानगरीत पहिला रुग्ण आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या घटनेला आयोजकांनीही दुजारो दिला आहे. एक अधिकारी कोरोनाबाधित आढळून आला असून, त्याला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
२३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी जगभरातील क्रीडापटू टोकयोमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे टोकयोमधील ऑलिम्पिक व्हिलिजेमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे. ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिली आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याची ही पहिलीच घटना आहे, असं आयोजन समितीनं सांगितलं आहे.
#BREAKING First case of Covid-19 in Tokyo Olympic Village: organisers pic.twitter.com/X98pwkHKem
— AFP News Agency (@AFP) July 17, 2021
जपानसह जगभरातील कोरोनाचा धोका अद्याप नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करावी अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्या मागणीकडं दुर्लक्ष करत जपान सरकार आणि ऑलिम्पिक समितीनं ही स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. कोरोना लाटेमनुळे ही स्पर्धा यंदा एक वर्ष उशीरा होत आहे.
ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर टोकयोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ही आणीबाणी २२ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. म्हणजेच २३ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत होणारं ऑलिम्पिकचं आयोजन पूर्णपणे आणीबाणीच्या काळात होणार आहे. ‘देशात भविष्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, म्हणून आणीबाणी लागू करावी लागली,’ असं जपानच्या पंतप्रधांनी स्पष्ट केलं आहे.
एका सदस्याला विमानतळावरूनच रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल
टोकियो ऑलिम्पिकसाठी शुक्रवारी नायजेरियाच्या खेळाडूंचं पथक नारिटा विमानतळावरून टोकियोला रवाना होणार होतं. पथकातील एक एक सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या व्यक्तीला सौम्य लक्षणं होती, मात्र वय जास्त असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.