HW News Marathi
महाराष्ट्र

पटोले, चव्हाण, यांच्यावर आंदोलनाचे गुन्हे दाखल केले का? तर बाईक रॅलीवर नरेंद्र पाटील ठाम!

मुंबई। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का?, असा सवालच आता उपस्थित करण्यात आला आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी १८ जुलै रोजी बाईक रॅली काढणारच, असं मराठा आक्रोश मोर्चाचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज सांगितलं आहे.

नरेंद्र पाटील य आज नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा सवाल केला. सोलापूर येथील मोर्चानंतर नवी मुंबईत या बाईक रॅलीचे मराठा आक्रोश मोर्चाने आयोजन केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच ही रॅली काढली जात आहे. सोलापूर व अन्य ठिकाणी मराठा आक्रोश मोर्चाच्या कार्यर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नाना पटोले अशोक चव्हाण, भाई जगताप यांच्यावर गुन्हे दाखल केले का? याबाबत पोलीस महासंचालकांनी माहिती दयावी, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

इंधन दरवाढ –

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असला तरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. वाढती महागाई तसेच इंधन दरवाढी विरोधात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला, या वेळी ते बोलत होते.

युपीए सरकारच्या कार्यकाळात एक किंवा दोन रुपयांची जरी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर विरोधी पक्ष म्हणून भाजप मोठ्या प्रमाणात टीका करत होते. त्यांनी त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ घातला होता. आता मात्र, पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहे. असे असतांना केंद्रातील सत्ताधारांनी झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे आमदार बहुदा राष्ट्रवादीमूळे निवडून आले, शरद पवारांच्या उत्तराला दरेकरांचे प्रत्युत्तर

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!

News Desk

बॉलिवूड क्षेत्र यात काम करायला मोठी संधी,अशी कामं होत असतील तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे – गिरीश बापट

News Desk