HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यात ठाकरे सरकार मग्न, शेलारांचे टीकास्त्र!

मुंबई। सणासुदीच्या काळात दिल्लीच्या पथकाने दहशतवाद्यांना धारावीतून अटक केली आहे. यामुळे मुंबईतील घातापात उधळून टाकण्यात दिल्लीच्या पथकाला यश आलं आहे. दिल्लीच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन कारवाई केल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे. मुंबईत धारावीत आणि राज्यातसुद्धा आशा प्रकारच्या दहशतवाद्यांचा निवास आणि कटकारस्थान सुरु होते तर राज्यातले एटीएस पथक झोपले होते का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यामध्ये सरकार मग्न असलेले पोलीस या प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करतील का? गृहमंत्र्यांनी देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला

सणासुदीच्या काळात दिल्लीच्या पथकाने दहशतवाद्यांना धारावीतून अटक केली आहे. यामुळे मुंबईतील घातापात उधळून टाकण्यात दिल्लीच्या पथकाला यश आलं आहे. दिल्लीच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन कारवाई केल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे. मुंबईत धारावीत आणि राज्यातसुद्धा आशा प्रकारच्या दहशतवाद्यांचा निवास आणि कटकारस्थान सुरु होते तर राज्यातले एटीएस पथक झोपले होते का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यामध्ये सरकार मग्न असलेले पोलीस या प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करतील का? गृहमंत्र्यांनी देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

गृहमंत्री भूमिका स्पष्ट करतील का?

नॉन कॉग्नीजेबल ऑफेन्समध्ये केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे पोलीस, पत्रकारांना हटकवताना हात नाही तर लाथ लावू असे सांगणारे पोलीस आणि राज्यातल्या एका आमदारावर लुक आऊट सर्क्युलर काढण्याचा प्रकार करणारे आमच्या राज्याचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते. याबाबतीत गृहमंत्री भूमिका स्पष्ट करतील का? या सगळ्या प्रकारची माहिती राज्यातील पोलिसांना होती का? गृहमंत्र्यांना होता का? त्यांना कल्पना होती तर त्यांनी काय भूमिका घेतली? का मग पुन्हा विशेष वर्गातील लोकं असतील तर मवाळ भूमिका असं काही राजकीय प्रकरण नाही ना? म्हणून या गंभीर विषयावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या इंटेलिजेंस फेल्युरवर भूमिका स्पष्ट करावी. अजून अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाया करण्याच्या मनस्थितीमधील लोकं आहेत का? याचा शोध घेण्याचा ससेमीरा वाढवावा असं आमचे म्हणणं आहे. या विषयावर गृहमंत्र्यांनी बोलावं असे आंमचे आवाहन असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण पूर्वेकडील स्कायवॉकचे काम पूर्ण

News Desk

गणेशोत्सवापूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा! – रवींद्र चव्हाण

News Desk

देशातील महाराष्ट्र हे राज्य कोरोना चाचण्यांत अव्वल

News Desk