HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेकडून स्वप्नील लोंकरच्या परिवाराला १० लाखांची मदत, बहिणीच्या शिक्षणासाठीही मदत- एकनाथ शिंदे

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊन सुद्धा नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने काही आठवड्यांपूर्वी आत्महत्या केली होती. स्वप्निलच्या कुटुंबियांना अनेक मंत्रिमंडळी भेटायला गेले परंतु ठाकरे सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही म्हणून त्यांच्यावर विरोधकांनी टीका करत स्वप्निलच्या आत्महत्येला ठाकरे सरकारला दोषी ठरवलं. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१५ जुलै) स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेतली.

शिवसेनेकडून १० लाखांची मदत

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येला विरोधकांनी ठाकरे सरकारला दोषी मानलं. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१५ जुलै) स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारलं असता पावसाळी अधिवेशात याबाबत चर्चा झाली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

स्वप्निलच्या आत्महत्येचा कारण काय?

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… म्हणून पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं”, उध्दव ठाकरेंकडून राज्यपालांना प्रत्यूत्तर!

News Desk

‘भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत पण…’गृहमंत्र्यांचे त्या चौकशीवर स्पष्टीकरण

News Desk

राज्यपालांच्या डोक्यात काय आहे तेच माहीत होत नाही – गुलाबराव पाटील

News Desk