मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती होण्याच्या शर्यतीत असल्याची कालपासून राज्यभर, देशभर चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
कालपासून माध्यमातून पवारसाहेब राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत असून त्याबाबत आज नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भातील चर्चांना शरद पवार यांचं उत्तर
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारंवार भेट घेत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बातम्या चुकीचे असल्याचे शरद पवार यांनी आज (बुधवारी) स्पष्ट केलं. मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असल्याच्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. या निवडणुकीचा निकाल काय येईल हे सर्वांनाच माहिती आहे. कारण, समोर 300 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाचाही उमेदवार असणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
It is absolutely false that I will be a candidate for the Presidential election. I know what will be the result, given the party that has more than 300 MPs. I will not be a candidate for the Presidential election: NCP chief Sharad Pawar
(File photo) pic.twitter.com/uzLbYip3nE
— ANI (@ANI) July 14, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.