HW News Marathi
Covid-19

१२ वर्षांवरील मुलांना लवकरच मिळणार कोरोना लस

नवी दिल्‍ली | देशात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सूरु आहे. अशात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं सांगितलं जात होतं. यात लहान मुलांना कोरो नालस कधी देणार याची चर्चा सुरू असताना एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षांवरील मुलांना लवकरच देण्‍यात येणार आहे.

गर्भवती महिलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्‍यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आपत्तकालीन काळात लस देण्‍यासंदर्भातील निर्णयानंतर मुलांना लस देण्‍याचा निर्णय होवू शकतो. अशी माहिती आरोग्‍य मंत्रालयाच्‍या वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी दिली. देशातील लस उत्‍पादक कंपनी झायडस कॅडिलाने १२ वर्षांवरील मुलांसाठीच्‍या लसची चाचणी घेतली आहे. या लसीला परवानगी मिळाल्‍यानंतर १२ वर्षांवरील मुलांसह प्रोढांनाही ही लस देण्‍यात येणार आहे.

२ वर्षांवरील मुलांनाही मिळणार लस

सध्‍या २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना देण्‍यात येणार्‍या लसीबाबत कोवाक्‍सिनचे परीक्षण सुरु आहे.त्‍यामुळे सप्‍टेंबर महिन्‍यानंतर १२ वर्षांपेक्षा कमी मुलांनाही लस देण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे.मुलांना लस देण्‍यासाठी आरोग्‍य मंत्रालयाच्‍या लसीकरण विभागाने तयारी पूर्ण केली आहे.

१८ वर्षांपेक्षा कमी लोकसंख्‍या ३२ कोटींहून अधिक

आरोग्‍य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, देशात १८ वर्षांवरील लोकसंख्‍या ९४ कोटींहून अधिक आहे. तर १८ वर्षांपेक्षा कमी लोकसंख्‍या ही ३२ कोटींहून अधिक आहे.देशात मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम राबवले जातात. आरोग्‍य विभागाला याचा मोठा अनुभवही आहे. त्‍याचप्रमाणे मुलांसाठीही लस देण्‍याचा कार्यक्रम राबविण्‍याचे नियोजन आहे.

‘झायडस कॅडिला’ने सुरु केले लसीचे उत्‍पादन

लस उत्‍पादक कंपनी झायडस कॅडिलाने लसचे उत्‍पादन सुरु केले आहे.आपत्तकालीन वापरासाठी अद्‍याप कंपनीला परवानगी मिळालेली नाही.तीन महिन्‍यात चार कोटी लस उत्‍पादनाची क्षमता असल्‍याचे कंपनीने सरकारला कळविले आहे. ही क्षमता पूर्ण करण्‍यासाठी कंपनीने आतापासूनच लस उत्‍पादन सुरु केले आहे. ऑगस्‍ट महिन्‍यापर्यंत लसीचे एक कोटी डोस उपलब्‍ध करण्‍यासाठी कंपनी प्रयत्‍न करीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ७,७१७ नवे कोरोनाबाधित, तर १०,३३३ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

चिंतादायक! देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६८ हजार ८३३ कोरोना रुग्णांची नोंद

Aprna

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्माचाऱ्यांना पगार न दिल्यास त्यांची मान्यता होणार रद्द !

News Desk