HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी, २४ तासांत ३७,१५४ नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात ३७,१५४ नवे रुग्ण आढळून ७२४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत ३ कोटी ६३ लाख ४४ हजार ५८१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज 6 हजार 13 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 59,12,479 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के इतके झाले आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९१%

१० जुलै २०२१ रोजी ३,६६,०३६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९१% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार ! जयंत पाटलांची माहिती

News Desk

कोरोना लसीचे २ डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या, अजित पवार मुख्यमंत्र्यांची करणार चर्चा

News Desk

शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या सर्व चाचण्या अन् उपचार मोफत

News Desk