HW News Marathi
Covid-19

पुण्याच्या महापौरांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने केला सन्मान !

पुणे | संपूर्ण देशात मागच्या वर्षापासून कोरोनाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण संख्या कमालीची वाढली होती. मुंबई, पुणे, नागपूर अशी महत्वाच्या शहरांत कोरोना रुग्ण वाढले होते. पुण्यातही कोरोनानं थैमान घातलं होतं. अशा परिस्थितीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कमालीची कामगिरी केली. या कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये पुणे शहराला मोठा फटका बसला होता. पुणे जिल्ह्यासह शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही चिंताजनक होती. आता कोरोनाची दुसरी लाट देखील शहरातून ओसरली असून पुणेकरांना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, कोरोना काळात केलेल्या रोग निवारणासाठी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन’ने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना सन्मानित केलं आहे.

हा सन्मान स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी हे यश कर्मचाऱ्यांसह सामान्य पुणेकरांचं देखील असल्याचं म्हटलं आहे. ‘कोरोना काळातील कामाची दखल ‘World Book Of Records, London’ कडून ! आपल्या पाठीमागे आपल्या कामाची दखल घेतली गेली आहे, ही भावना प्रचंड सुखावणारी आहे. कोरोना काळात पुणेकरांच्या सेवेत सर्व पातळ्यांवर काम करत असताना याची नोंद ‘World Book Of Records, London’ ने घेतली आहे,’ अशी माहिती मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

यासोबतच, ‘कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद म्हणून ‘Certificate Of Commitment’ हे कामाची नोंद घेणारे प्रमाणपत्र आज संस्थेकडून आपण स्वीकारले. ‘World Book of Records’ मधील ही नोंद माझ्या वैयक्तीक नव्हे तर पुणे शहराने केलेल्या सामूहिक प्रयत्नांची आहे, असे मी मानतो. कोरोना काळात विविध घटकांनी मोलाची साथ दिली, न डगमगता भक्कमपणे उभे राहिले, त्यासर्वांच्या ऋणात राहूनच या जागतिक नोंदीनिमित सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !,’ असं देखील मोहोळ म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त !

News Desk

“राज्यात १ मेपासून लसीकरण तेव्हाच सुरु होऊ शकेल जेव्हा…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

News Desk

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

News Desk