HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळेंची मयत स्वप्नील लोणकर च्या कुटुंबियांना भेट!

पुणे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्वप्नीलच्या आत्महत्येचं पडसाद महाराष्ट्रभर उटमले असून अनेकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभारावरुन टीका केली आहे. स्वप्निल च्या आत्महत्येनंतर

अनेक राजकीय नेतेमंडळी स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियाची विचारपूस करत आहेत. आज स्वप्नीलच्या आईवडिलांची त्यांच्या मूळ गावी केडगाव, तालुका दौड येथे जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनीही भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या बहिनीसह संपूर्ण कुटुंबिय़ाचे सांत्वन केले.

स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं ?

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला . या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला . त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

सुसाईड नोट मध्ये काय लिहिलंय?

पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. २४ वय संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा, १०० जीव वाचवायचे होते, मला डोनेशन करुन मात्र आता ७२ राहिले, अशी सुसाईड नोट स्वप्नीलने लिहिली होती.

यापूर्वीही अमित ठाकरे यांची भेट-

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येप्रकरणी अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून एमपीएससी परीक्षांवरून राज्य सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दात टीका केली. ‘एमपीएससी’ची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणारा स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर ‘एमपीएससी हे मायाजाल आहे’ असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच ‘एमपीएससी’ परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल, अशी अपेक्षा अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांची धमकी तर ‘फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू’ पटोलेंचं प्रत्युत्तर!

News Desk

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Aprna

सुप्रिया सुळेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा !

News Desk