HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपद घ्यायला मी तयारं ! पण…शिवसेनेचे भास्कर जाधव काय म्हणाले ?

 

गुहागर। महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच शिवसेनेने स्वीकारावं, असं भास्कर जाधव म्हणालेत. तसेच तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असंही त्यांनी सांगितलंय. भास्कर जाधव गुहागरमध्ये बोलत होते. शिवसेनेकडे आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.

वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये-

केवळ दोन दिवसांच्या या अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी नियुक्त केलेल्या भास्कर जाधव यांनी अधिवेशन गाजवलं होतं. त्यांनी भाजपच्या १२ आमदारांची विकेट काढली. तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या गोंधळामुळे ते अधिवेशनानंतर देखील चर्चेत आले होते. शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये

कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं हे तिन्ही पक्षांनी मिळून ठरवायचं असतं. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालंय. शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम आहे. शिवसेनेकडे वनखातं तसंच ठेवून जर अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावं. एक तर शिवसेनेकडे महत्त्वाची खातीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावं असं मला वाटत नाही, असंही भास्कर जाधवांनी स्पष्ट केलंय.

यासाठी मी आक्रमक भूमिका घेतली-

शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले की, “तालिका अध्यक्षपद घेतल्यानंतर या पदाचे अधिकार, सदस्यांचा मान-सन्मान राखणे, महत्त्वाचे विषय हाताळताना नियम व शिस्त याला प्राधान्य देण्याचे मी ठरवले होते आणि यातून दिर्घकाळ आपली कामगिरी लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे असा विचार केला होता. मी विरोधी पक्षाला पुरेपूर संधी दिली होती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि इतर विधेयक मंजूर करताना विरोधी पक्षाला चर्चेत सहभागी होण्याची सूचना केली होती. विरोधी पक्षाने सभागृहातील चर्चेत भाग घेतला नाही.” “विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा भरवली तेथे स्पीकर लावून भाषणे झाली. भाजपचे साठ आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घुसले, तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केली. या साऱ्या प्रकारचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी सभापती हरीभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी केले. मी पाच वेळा विधानसभेत निवडून गेलो आहे.अधिवेशनात चुकीच्या प्रथा पडता कामा नये. नव्याने येणाऱ्या सदस्यांना विधानसभेचे कामकाज समजले पाहिजे यासाठी मी आक्रमक भूमिका घेतली.”

सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा-

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन भास्कर जाधव यांनी चांगलंच गाजवलं. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर भाजप नेते सरकारला धारेवर धरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीचा काही काळ तसं चित्रही पाहायला मिळालं. मात्र भास्कर जाधव जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून बसले, त्यावेळी सभागृहातील चित्रच पालंटलं. जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सभागृहातील जाधव यांच्या पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा’, यशवंत जाधवांचा आशिष शेलारांना टोला

News Desk

पालघर जिल्ह्यात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप

News Desk

विधानसभाध्यक्षांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला

swarit