HW News Marathi
व्हिडीओ

प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला ब्रेक..‘का’ गेले सुट्टीवर?

अनेक नेते उन्हाळ्यात हवा बदलासाठी परदेशात सुट्टीवर जात असतात. त्यात काही नवं नसतं. ते सुट्टीवर गेले तरी पक्षाकडे आणि राजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असते. मात्र, जर एखादा नेता तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर जाण्याची घटना क्वचितच घडते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर गेले आहेत. याची माहिती आंबेडकरांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी एक व्हिडीओ ट्विट करत याची माहिती दिली आहे. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे.

#prakashambedkar #vanchitbahujanaghadi #maharashtra #VBA #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात” – Sachin Sawant

News Desk

Andheri पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Seema Adhe

“यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार” – Shambhuraj Desai

News Desk