HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर ३ महिन्यांच्या सुट्टीवर!

मुंबई | अनेक नेते उन्हाळ्यात हवा बदलासाठी परदेशात सुट्टीवर जात असतात. त्यात काही नवं नसतं. ते सुट्टीवर गेले तरी पक्षाकडे आणि राजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असते. मात्र, जर एखादा नेता तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर जाण्याची घटना क्वचितच घडते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर गेले आहेत. याची माहिती आंबेडकरांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी एक व्हिडीओ ट्विट करत याची माहिती दिली आहे. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे.

 

काय आहे कारण?

प्रकाश आंबेडकरांनी तीन महिने सुट्टीवर जाण्याचं कोणतंही कारण दिलं नाही. वैयक्तिक कारणांसाठी सुट्टीवर जात असल्याचं त्यांनी म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. आंबेडकर यांनी व्हिडीओ शेअर करून हे सांगितलं. त्यात त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं दिसून येत आहे. मग आंबेडकर सुट्टीवर का जात आहेत?, असा सवाल केला जात आहे. वंचितने पाच जिल्ह्यातील निवडणुकांमधून अंग काढून घेतले आहे का? त्यासाठी आंबेडकरांनी सुट्टी घेतली आहे का?, असे सवाल या निमित्ताने केले जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बजरंग दलाने ‘कामसूत्र’ पेटवलं! नेमकं काय कारण?

News Desk

भाजपा कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर आशिष शेलार यांचं मोठ विधान, म्हणाले…

News Desk

“तुम्ही फक्त लॉकडाऊन घोषित करण्यापुरते मुख्यमंत्री झाले आहात का?”, पडळकरांचा सवाल

News Desk