HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २४ तासांत होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून कुणाची लागणार वर्णी?

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मात्र, आता केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल पुढच्या २४ तासांच्या आत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी (७ जुलै) संध्याकाळी साडे पाच वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं समजतये या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची देखिल शक्यता आहे. तर २० नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणे आणि नड्डा यांची भेट झाल्यानंतर राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही खासदार सध्या दिल्लीत आहे. दरम्यान, राणे आणि पाटील यांना मंत्रिपदाबाबत विचारलं असता त्यांनी मौन बाळगल्याचं आता पाहायला मिळाल आहे.

तर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक! – धनंजय मुंडे

Aprna

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

Aprna

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

Aprna