HW News Marathi
महाराष्ट्र

“हे ठाकरे सरकार नाही तर राष्ट्रवादीचं सरकार”, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई। महाराष्ट्र विधिमंडळाच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आजचा (६ जुलै) अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर झालेल्या भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर भाजप चांगलाच आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे. विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय, या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर लगेच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडून या सरकारवर आरोप केलेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या वसुली प्रकरणाचा किंवा त्यात वाझे या वरून कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे वाझे नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

महाविकास आघाडीत प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हीच महत्त्वाची पक्ष आहेत त्यातल्या त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचेच निर्णय महत्त्वपूर्ण मानले जातात म्हणून यावरही आता फडणवीसांनी तोफ डागत हे ठाकरे सरकार नाही तर राष्ट्रवादीचं सरकार आहे. आणि वारंवार उद्धव ठाकरेंचा मुखवटा या सरकार मध्ये वापरला जातोय अशी प्रतिक्रिया विधान भवनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.

चंद्रपूर जिल्हा मी दारूमुक्त आणि ठाकरे सरकारने दारूयुक्त केला !

राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्या नंतर या निर्णयावर विरोधी पक्षांनी चांगलीच टीका केली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आहे चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, यावर आज पुन्हा विधानभवनात फडणवीसांनी टीका केली आहे, की चंद्रपूर जिल्हा मी दारूमुक्त केला आणि ठाकरे सरकारने दारूयुक्त केला. अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार?, सोमय्या दापोलीकडे रवाना

Manasi Devkar

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी, कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

ऊसतोड मजुरांना अडवल्यामूळे आमदार सुरेश धस यांना अटक, तर गुन्हा नोंदवून जामिनावर सुटका

News Desk