HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार: ‘MPSCच्या रिक्त जागा 31 जुलै 2021 पर्यंत भरणार’

31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागा भरणार आहोत, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली आहे. विधिमंडळात याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “एमपीएससी संदर्भात आम्ही स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे. दीड वर्षांपासून मुलाखती घेतल्या जात नाहीयेत. लोक प्रतीक्षेत आहेत. तरुणाई निराश होतेय. या विषयात सरकार गंभीर नाही.”एमपीएससीच्या 430 च्या वर विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितलं. एमपीएससीचे सर्व विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत असल्याचंही ते म्हणाले. स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना आजच सभागृहामध्ये 50 लाख रुपयांची मदत जाहीर कण्याची मागणीदेखील मुनगंटीवार यांनी केली.

#MPSC #AjitPawar #SwapnilLonkar #MaharashtraAssembly #MahaVikasAghadi #Pune #NCP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुंड गजा मारणेला ‘सिंघम’स्टाईल पोलिसांनी कसं पकडलं? पाहा थरारक CCTV फुटेज !

News Desk

“त्यांचा एक बाप असेल तर येतील”, Shivsena Bhavan ताब्यात घेण्यावरून राऊत आक्रमक

News Desk

Farmer suicides increased 91% in Maharashtra | ४३% पिडित शेतकरी कुटुंबाला मदत नाहीच

News Desk