HW News Marathi
Covid-19

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा जास्त, कोरोनामुक्त कमी

मुंबई । राज्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीशी चिंताजनक बातमी समोर आहे. आज (४ जुलै) राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा जास्त असून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा तुलनेने अगदीच कमी आहे. राज्यात गेल्या २४ तासांत, ९ हजार ३३६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ३ हजार ३७८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत राज्यात १२३ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यापेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र, आज कोरोनाबाधितांची संख्या जास्त दिसत आहे. दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख ४८ हजार ६९३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९५.९१ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे १ लाख २३ हजार ०३० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून डॉक्टरांच्या सुरक्षेचे आश्वासन

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध? उद्धव ठाकरे जनतेला आज संबोधित करणार

News Desk

Unlock 1.0 | देशात गेल्या २४ तासात ९९८३ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk