HW News Marathi
महाराष्ट्र

‘अजित पवारांचं नाव आम्ही कधी पासून घेतोय!’ जरंडेश्वर वरील कारवाई वर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

अहमदनगर। सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मामाच्या जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यात अजित पवार यांचं नाव सुद्धा आलं आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवारांचं नाव आता आलं. आम्ही कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल, असा दावा अण्णा हजारे यांनी केला आहे.

मी फकीर माणूस, माझं कोण ऐकतोय

अण्णा हजारे यांनी माध्यमांशू संवाद साधताना हा दावा केला. जरंडेश्वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आलं आहे. ते आम्ही कधीपासून बोलत आहे. पण मी फकीर माणूस. माझं कोण ऐकतोय. आता ईडीने लक्ष घातलं आहे. त्यातून सर्व बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे, असं हजारे म्हणाले.

आम्ही 4 हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे

आता जरांडेश्वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही 4 हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे. आता ते सत्र न्यायालयात आहे. केस सुरू आहे. योगायोगाने आता हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.

राजू शेट्टी यांनीही ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांनीही ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी अनेक दिवसांपासून सांगत आहे की, सीबीआय, ईडी या केंद्राच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो आहे. केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपवरही टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार !

News Desk

हिंदुस्थानी भाऊचं ‘ते’ चिथावणीखोर वक्तव्य नेमकं काय?

News Desk

अंबरनाथ गोळीबार प्रकरणी ३२ जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

Chetan Kirdat