HW News Marathi
Covid-19

‘पुण्यातील इतर दुकानं सुरु, पण मॉल्स का बंद?’, अजित पवारांनी सांगितलं कारण  

पुणे । पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा काही प्रमाणात कमी झाल्याने, नियम टप्या-टप्यांमध्ये शिथिल करण्यात आले होते. परंतु नियम शिथिल झाल्यावर पुन्हा रुग्णांमध्ये वाढ दिसून आली. या सगळ्या बाबी लक्षात ठेऊन पुणे महानगपालिकेने नवीन नियमावली सादर केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील. मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद राहतील. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 वाजेपर्यंत सुरु राहतील असं सांगण्यात आलं आहे.

दुकाने सुरु पण मॉल्स बंद का?

मॉलमध्ये सेंट्रलाईज एसी असतात, त्यामुळे एका भागातील हवा दुसऱ्या भागात जात असते. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढायला हातभार लागू शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितल्यामुळेच मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. आज (२ जुलै) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.इतर दुकानं उघडी ठेवण्याच्या निर्णयाची तुलना मॉलशी करता येणार ऩसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. इतर दुकानांमध्ये नागरिक कामापुरते जातात आणि हवी ती वस्तू घेऊन लगेच बाहेर पडतात.

मात्र मॉलच्या बाबतीत असं होत नाही. हवी ती वस्तू घेतल्यानंतरही नागरिक लगेच मॉलमधून बाहेर पडत नाहीत. त्यांची पावलं मॉलमध्येच इतरत्र फिरत राहतात, असं ते म्हणाले. अनेकजण तर काहीही खरेदी करायची नसताना, केवळ फिऱण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी मॉलमध्ये येतात आणि त्यामुळे विनाकारण गर्दी होण्याची शक्यता असून कोरोना संसर्ग वाढेल, अशा कुठल्याही शक्यतेला स्थान मिळणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत असल्याचं पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

नवीन नियमावली काय आहे?

– सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

– अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.

मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.

– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

– उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.

– खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.

– अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.

– लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक

– अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

– पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी

– कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक, नांदेड, परभणीत आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

News Desk

राज्यात हाॅटेल्स आणि लाॅज लवकरचं सुरू करण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Arati More

“मोदींनी देशात योग्य नियोजन केलं असतं तर…”, बच्चू कडूंचे केंद्रावर टीकास्त्र

News Desk