HW News Marathi
महाराष्ट्र

“पवारांबद्दल खालच्या पातळीवर बोला त्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही”, आव्हाडांनी पडळकरांना सुनावलं

मुंबई । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या बोचक टीकेचे पडसाद आता सर्वत्र दिसू लागले आहेत. पडळकर यांच्या टीकेवर अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या मध्ये शिवसेनेने सुद्धा आपले मत पाडळकरांविरुद्ध व्यक्त केले आहेत. या सगळ्या प्रकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांवर बोचरी टीका केली आहे.

आव्हाडांचा पडळकरांना टोला

‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोलावे लागते, म्हणून टीका होत असल्याचा टोला आव्हाडांनी लगावला. महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वश्रूत आहे की, जोपर्यंत शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर आपण टीका करत नाही. तोपर्यंत मीडिया आपली दखल घेणार नाही. आपल्याला बातमीत राहायचे असेल तर बाकी काही बोलले नाही तरी चालेल. पण, शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीत बोला. काम झालेच म्हणून समजा’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

 

पडळकर नेमकं काय म्हणाले?

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती.

पुढील ३० वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत’

तसेच ‘तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत’ अशी कोपरखळी त्यांनी मारली. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, असा चिमटा पडळकर यांनी पवारांना काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे..अजित पवार!

News Desk

‘एमपीएससी’ रिक्त पदे भरण्याचा मार्ग झाला मोकळा – उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

सचिन वाझे यांचा तपास आमच्याकडे द्या, ATS ची मागणी!

News Desk